March 31, 2020
Ajab Samachar

जल है तो कल है, पाणी वाचवा : आयुक्त डॉ. कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूर व पाणी पुरवठा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 मार्च, हा जलदिन म्हणून साजरा करणेत आला.  मनपा नेहरुनगर विद्यालय या शाळेत जलजागृती संदर्भात विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करणेत आले.  जीवनातील पाण्याचे महत्व, पाण्याची उपलब्धता, पाण्याचे साठे सुरक्षित ठेवणे, पाणी प्रदूषण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये पर्यायाने समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी जलदिनाचे प्रबोधनात्मक बॅनर घेवून विद्यार्थी व प्राथमिक शिक्षण समिती व पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी यांची जलजागृती रॅली नेहरुनगर परिसरात काढणेत आली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी हे प्रमुख उपस्थित होते.
रॅलीस उद्बोधित करताना आयुक्त कलशेट्टी यांनी ʅपाणी म्हणजे जीवन आहे, त्याला वाचवणे गरजेचे आहे, जल है तो कल है, प्रत्येकाने आवश्यक तेवढयाच पाण्याचा वापर केल्यास लाखो लिटर पाणी वाचवता येईलʆ, स्वत:च्या घरी, सार्वजनिक ठिकाणी कोठेही पाणी वाया जात असलेस एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ते रोखले पाहिजे.  स्वत:पासूनच त्याची सुरुवात केल्यास समाजात आपोपआप जलजागृती होईल, याबाबत उपस्थित विद्यार्थी, पालक, मनपाकडील कर्मचारी यांना आवाहनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी म्यु. ल. कृ. जरग विद्यामंदिर येथील विद्यार्थीनींनी उपस्थित मान्यवरांचेसमोर झांजपथकाचे प्रात्यक्षिक सादर केले.  तसेच कोल्हापूर महानगरपालिका शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळालेल्या व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या कु. प्रसन्न ओमकार यांचे कौतुक मा. आयुक्त, यांनी केले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले.  तर श्री. संजय पाटील, सहा.शिक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी उपआयुक्त मंगेश शिंदे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, प्रशांत पंडत, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, लेखापाल बाबा साळोखे, पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, क्रिडा निरीक्षक- सचिन पांडव, अजय गोसावी, संजय शिंदे, निलेश सरनाईक, मुख्याध्यापक शहाजी घोरपडे, शांताराम सुतार सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment