March 31, 2020
Ajab Samachar

कै.यशवंत भालकर यांचे स्मारक उभारणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ सिनेदिग्दर्शक कै.यशवंत भालकर यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात विविध पदांवर काम केले आहे. त्यांचे निधनामुळे मराठी चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रपट व्यवसायासाठी त्यांनी आजीवन दिलेले योगदान याचा विचार करता भावी पिढीस त्यांच्या कार्याची माहिती होणेसाठी त्यांचे यथोचीत स्मारक उभारणेसाठी  महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात महापौर सौ.सरीता मोरे यांच्या अध्यक्षस्थतेखाली चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी व भालकरप्रेमी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
    चित्रपट महामंडळाचे मिलींद आष्टेकर म्हणाले रंकाळा पदापथ उदयानात ज्या ठिकाणी स्मारक करावयाचे आहे. त्याठिकाणी 4 फुट भिंतीची उंची वाढवावी लागणार आहे. सदर स्टेजवर कार्यक्रम चालू असताना मागील बाजू दिसणार नाही. यासाठी या भिंतीची उंची 9 न् 30 लांबी रुंदी हवी आहे. यासाठी शिल्पकार किशोर पुरेकर यांनी प्राथमिक डिझाईन केले आहे.
    स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख म्हणाले या ठिकाणी फक्त भिंत वाढवून चालणार नाही. तर याच बरोबर त्याठिकाणी लाईट बरोबरच या परिसराचे सुशोभिकरण होणे आवश्यक आहे. यात शिल्पकाराने केलेले डिझाईन आहे तेच ठेवून आहे त्या भिंतीवर डिझाईन लहान आकारात करा. त्यामुळे कमी खर्च होईल त्याचबरोबर या स्टेजच्या परिसराचे सुशोभिकरणही करता येईल. निवडणूकीच्या आचारसंहितेपुर्वी बजेट स्थायी मार्फत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे एस्टीमेट, डिझाईन तयार करुन दया. कोल्हापूर महानगरपालिकेकडून या स्मारकासाठी 25.00 लाखाचा निधी उपलब्ध करुण देऊ.
    उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले भिंतीची उंची वाढविणे एैवजी सदरचे बजेट इतर कामात वापरण्यात यावे. तसेच यापुर्वी स्टेजला कोणाचे नांव देणेत आलेले आहे का ते तपासुन त्याचा प्रस्ताव सादर करणेत यावा. शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याशी संपर्क साधून संबधीत कनिष्ठ अभियंता यांनी जागेवर जाऊन तातडीने स्मारकाबरोबर सुशोभिकरणाचे एस्टीमेट सादर करा.
    महापौर सौ.सरिता मोरे यांनी सदरचे डिझाईन म्युरल्समध्ये बनवण्यात येणार असून ते ब्रांझमध्ये करण्यात यावे. शिल्पकार यांनी त्याचा 12 लाख खर्च दिलेला आहे. त्यामुळे येणा-या अर्थसंकल्पात या शिल्पासह लाई व्यवस्था, स्टेजचा परिसर सुशोभिकरण यासाठी रु.25 लाख बजेटची तरतूद करु.
यावेळी सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, कनिष्ठ अभियंता सुनिल भाईक, अरुण गुजर, सर्व्हेअर अर्जुन कावळे, सचिन देवाडकर, रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीचे संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, सुनील जाधव, शरद चव्हाण, रविंद्र बोरगांवकर, आर्टीस्ट किशोर पुरेकर, संग्राम भालकर, संदीप भालकर, सपना भालकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment