July 11, 2020
Ajab Samachar

राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी सहा उमेदवार निश्चित

२०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केलीय. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सहा संभाव्य उमेदवार कोण असतील याची पहिली यादी राष्ट्रवादीने तयार केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागावाटपाचा गुंता सुटला आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी ने आपल्याला मिळालेल्या मतदार संघात उमेदवार निश्चित करायला सुरूवात केलीय. रायगड, जळगाव, बीड, परभणीउस्मानाबाद, कोल्हापूर या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

रावेर, परभणी या मतदार संघातील्या अंतर्गत वादावर पडदा टाकून राष्ट्रवादीने निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. काँग्रेस ने दावा केलेल्या अहमदनगरवर दावा केलाय. तो पेच सोडविण्यासाठी दोनही पक्षांची बैठक ची बैठक होणार आहे. याही जागेवर तोडगा निघेल असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

भाजपचं आव्हान मोठं असल्याने फार ताणून धरता वाद मिटवून कामाला लागण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवलं आहे. तर भाजप आणि शिवसेनेत युतीचा घोळ अजुनही सुरूच आहे.

*हे आहेत २०१९ लोकसभा निवडणूकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार

रायगडसुनील तटकरे 

जळगाव –  अनिल भाईदास पाटील 

रावेर, परभणीस्थानिक नेत्यांनी एकमत होण्यासाठी वेळ मागितला 

बीडजयदत्त क्षीरसागर / अमरसिंग पंडित

कोल्हापूरधनंजय महाडिक 

Leave a Comment