January 29, 2020
Ajab Samachar

मिताली राजने रचला इतिहास….!

कोल्हापूर(तुषार पाटील):- भारतीय संघाची कर्णधार मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली.भारतीय संघाने आजवर २६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी २०० सामन्यांमध्ये मिताली भारताकडून खेळली आहे.मितालीने १९९९ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर भारताने २१३ एकदविसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ १३ सामन्यात मिताली खेळली नाही.मितालीने २०० एकदिवसीय सामन्यात ७ शतकांसह ५१.६६ च्या सरासरीने ६ हजार ६२२ धावा केल्या आहेत.सर्वाधिक वन-डे सामने खेळणाऱ्या महिला खेळाडू खालीलप्रमाणे आहेत.

२०० सामने : मिताली राज (भारत)
१९१ सामने : चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
१७४ सामने : झुलन गोस्वामी (भारत)
१४४ सामने : अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल (ऑस्ट्रेलिया)
१४३ सामने : जेनी गन (इंग्लंड)

Leave a Comment