January 29, 2020
Ajab Samachar

राज्यस्तरीय आभियांत्रिकी फुटबॉल स्पर्धेत केआयटी अजिंक्य

कोल्हापूर(प्रतिनिधी) : 7 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान मुंबई येथील “के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग” अंतर्गत “स्क्रीम-2019” हे राज्यस्तरीय आभियांत्रिकी महाविद्यालयातील क्रीडा संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये एकुण 16 प्रकारचे खेळ आयोजित केले होते.  कोल्हापूरातील “केआयटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस्), कोल्हापूर” या महाविद्यालयाने फुटबॉल या क्रीडाप्रकारामध्ये सहभाग घेतला.  

या क्रिडाप्रकारामध्ये पुणे, मुंबई, हैदराबाद, गोवा इत्यादी शहरांमधुन एकुण 32 संघ सहभागी झाले होते.  केआयटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग संघाने 4 फेरीमध्ये विजय मिळवुन अंतिम फेरीत “पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे” या संघाला पेनॉल्टी शूट आऊटवर मात करुन विजेतेपद पटकावले. 

तसेच के.आय.टी.च्या अभिराज काटकर यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि विवेक निकम यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलकिपर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  संघाला रोख रुपये 32,000/- व मानचिन्हाने गौरविण्यात आले.  संघामध्ये कर्णधार देवव्रत पवार, ऋषिकेश वाडकर, विवेक निकम, अभिराज काटकर, सिध्देश हांडे, समर्थ पाटील, समिर नागवेकर, अनिकेत घाटगे, सौरभ इतापे, शुभम चव्हाण, प्रतिक पाटील, प्रणव बेडेकर, राहूल पोवार, उध्दव भोसले, ऋषिकेश पाटील, सागर बांदिग्रे, सुमित महेकर यांचा समावेश होता. संघाला कॉलेजचे संघव्यवस्थापक ओंकार कदम, क्रीडाशिक्षक प्रा. विजय रोकडे, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी आणि संस्थेचे चेअरमन श्री. भरत पाटील, व्हा. चेअरमन श्री. सुनिल कुलकर्णी व सेक्रेटरी श्री. दिपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment