Ajab Samachar

रोहित सुपर हिट, भारताचा न्यूझीलंडवर सात विकेट राखून विजय

गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजी नंतर सलामीच्या जोडीने केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावा केल्या होत्या. भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला.

भारताच्या कृणाल पंड्याने तीन विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कृणालला यावेळी अन्य गोलंदाजांनीही चागली साथ दिली. न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने अर्धशतकी खेळी साकारली.

न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भाराताच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला चांगली साथ दिली. विजय शंकर १४ धावा करून बाद झाला. तर रिषभ पंतने धोनी सोबत नाबाद ४४ धावांची भागीदारी केली. रिषभने विजयी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Leave a Comment