July 11, 2020
Ajab Samachar

आगामी लोकसभेला पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभा राहीन : मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये त्याचे वातावरण दिसू लागले आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘उमेदवार कोण? या विषयाला पूर्णविराम दिला आहे’ असे सांगितले. यावरून राष्ट्रवादी पक्षामध्ये हालचालींना वेग आला आहे असे म्हणावे लगेल. पक्ष अध्यक्ष खासदार शरद पवार व ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवाराची निवड करतील. त्याच उमेदवाराच्या पाठिशी राहून त्याला निवडून आणू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ताराबाई पार्कातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षातर्फे राज्यभर काढण्यात येणाऱ्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या नियोजन बैठकीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांची  भूमिका स्पष्ट केली.

यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले कि, ‘ शुक्रवारी मुंबईत पक्षप्रमुख खा.शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असून यामध्ये कोल्हापूर हातकणंगले जागा वाटपाबाबत चर्चा होऊन हातकणंगलेची जागा आहे तशी मित्रपक्षाला देण्यात आली असून कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. आता यासर्व घडामोडीनंतर कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचे कोणते रंग पाहायला मिळणार ते पहावे लागेल.

Leave a Comment