July 18, 2019
Ajab Samachar

केंद्र सरकार कडून २००० च्या नोटांची छपाई बंद; कारण…..

२०१६ मध्ये मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर 2000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण, बाजारात 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं सध्या छपाई थांबवण्यात आल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले की, व्यवहारातील एकूण चलनापैकी 35 टक्के 2 हजार रुपयांच्या नोटा प्रचलनात आहेत. पुढे त्यांनी असेही सांगितले की, नोटांची छपाई आवश्यकतेनुसार केली जात आहे. सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिक २००० रुपयांच्या नोटा आहेत, व्यवहारात या नोटांचे एकूण 35 टक्के एवढं प्रमाण आहे. त्यामुळे २००० च्या नोटेची छपाई बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment