July 11, 2020
Ajab Samachar

पंचगंगा नदीमध्ये जयंती नाल्याचे सांडपाणी न मिसळणेबाबत दक्षता घेणेच्या आयुक्तांच्या सूचना

कोल्हापूर(प्रतिनिधी) : पंचगंगानदीमध्ये जयंती नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लो झालेने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सकाळी पाहणी केली. यावेळी अति.आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उप-जल अभियंता (यांत्रिकी) रामनाथ गायकवाड, कनिष्ठ अभियंता आर.के.जाधव उपस्थित होते. यानंतर आयुक्तांनी तातडीने बैठक बोलावून भविष्यात पुन्हा जयंतीनाला ओव्हरफ्लो न होणेबाबत दक्षता घेणेच्या सूचना संबंधीत अधिका-यांना दिल्या. जल अभियंता यांनी काही तांत्रीकबाबी निर्माण झालेमुळे सदरचा नाला ओव्हरफ्लो झालेचे सांगितले. यावर आयुक्तांनी दक्षता घेऊन त्याठिकाणी पाणी स्टोअर करणेची मर्यादा वाढविणेसाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी तांत्रीकबाबी तपासून अहवाल सादर करणेच्या सूचना अतिरिक्त आयुक्तानां दिल्या. यासाठी या ठिकाणचा गाळ उपसा करणे, बाजूपट्टी स्टोअरेट मर्यादा वाढविणे याची पडताळणी करण्याच्याही सूचना दिल्या. यावेळी विश्व इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, अतिरिक्त आयुक्त व जल अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रत्येकाने आप आपली कामे जबाबदारीने करा अशा सूचना देऊन प्रदुषणाबाबत कोणाचीही गय केली जाणार नसलेचे सांगितले.

    यानंतर दुपारी २ वाजता आयुक्तानी जयंती नाला, सुतारमळा-सिध्दार्थनगर, जुना बुधवारपेठ येथील नदीमध्ये मिसळत असलेल्या नाल्यांच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी जयंती नाला येथील बंद असलेला पंप तातडीने सुरु करुन नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबविण्यात आले. तसेच सुतारमळा-सिध्दार्थनगर येथील नाल्यावर मातीचा बंधारा घालून ओव्हरफ्लो झालेले पाणी अडवून ब्लिचींग पावडर डोस देण्याच्या सुचना दिल्या. जुना बुधवारपेठ येथील गटारीतून येणारे सांडपाणी नाल्यामध्ये मिसळत असलेने ड्रेनेज विभागामार्फत गटारीच्या चेंबरमधुन मोठ्या पाईपद्वारे ड्रेनेजच्या चेंबरला जोडण्याच्या सुचनाही जल अभियंता यांना दिल्या.  यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रन मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरणवादी उदय गायकवाड, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबरे, शाखा अभियंता राजेंद्र पाटील, विश्व इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजर पवणकुमार आदी उपस्थित होते.

Leave a Comment