Ajab Samachar

मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला; काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना पर्याय नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी बोलताना, शरद पवार हे काँग्रेसची वकिली करत आहेत. काँग्रेसला त्यांच्यासारखा मोठा वकिल लाभला आहे. तर, पवारांनाही काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले मत कॉंग्रेसच्यच्या बाजूने मांडले होते. तसेच देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी अहमदनगर येथे केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांच्या या टीकेचा समाचार घेत; अगुस्ता वेस्टलँडसारख्या व्हीव्हीआयपी घोटाळ्या विषयी विचारलेल्या प्रश्नांवर काँग्रेस परिवाराने उत्तरे  द्यावीत. आतापर्यंत तावातावाणे बोलणारे आता गप्प का, असा प्रश्न ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी काँग्रेसला विचारला. तसेच काँग्रेसच्या बाजुने मत मांडणाऱ्या पवारांविषयी बोलताना  फडणवीस यांनी पवारांना  काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असा जोरदार टोला लगावला.

Leave a Comment