January 29, 2020
Ajab Samachar

राज ठाकरेनी काढलेल्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रानेच प्रतिउत्तर

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. मोदिंनी दिलेली मुलाखत ही ‘फिक्स’ होती, त्यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरं अशा स्वरूपाची ‘मनमोकळी’ मुलाखत होती, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रा द्वारे हाणला होता. राज ठाकरेंनी काढलेल्या या व्यंगचित्रात थोडासा बदल करून भाजपानं राज यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे काही महिन्यांपूर्वी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन भाजपाने ‘क्रोध मोदींच्या यशाचा, एक ‘सेटिंगवाली’ मुलाखत’, या मथळ्याखाली व्यंगचित्र काढलंय.

 भाजपने काढलेल्या या व्यंगचित्रात राज ठाकरे शरद पवार यांनाच, ‘साहेब बोला काय विचारू’ असं म्हणताहेत. त्यावर, ‘पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरं तयार आहेत’, असं पवार सांगत असल्याचं दाखवण्यात आलंय. व्यंगचित्राच्या एका कोपऱ्यात राज ठाकरे यांची ‘बोलघेवडा पोपट’ म्हणून खिल्ली उडवण्यात आली आहे. थोडक्यात, तुमची मुलाखत ‘फिक्स’ होती, असा पलटवार भाजपाने केला आहे. मनसेचं इंजिन खाली कोसळत असल्याचा टोमणाही भाजपाने मारलाय.

Leave a Comment