Ajab Samachar

पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांसाठी बीसीसीआय देणार 20 कोटी

निखिल वीर (सातारा) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने स्तुत्य निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून बीसीसीआय आर्मी वेलफेअर फंडासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान हा निधी दिला जाईल. पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआय तिन्ही सैन्यदलप्रमुखांना निमंत्रित करण्याची योजना आखत असल्याची देखील माहिती मिळत आहे.

आयपीएलमध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये होणार आहे. या सामन्यावेळी बीसीसीआय शहिदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 20 कोटीं आर्मी वेलफेअर फंडात जमा करणार आहे. यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी देखील उपस्थित असणार आहे. या निर्णयाला बीसीसीआयच्या समितीने मंजुरी दिल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. उद्घाटन सोहळ्यासाठी खर्च होणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचे ठरले होते. गेल्या वर्षी उद्घाटन सोहळ्यासाठी 15 कोटी खर्च झाले होते, यावर्षी यात वाढ होऊन ते 20 कोटी झाले होते. हा पैसा आर्मी वेलफेअर फंडसाठी देण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.

Leave a Comment