May 25, 2020
Ajab Samachar

प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीने बापाचा काढला काटा.

बंगरुळु प्रतिनिधी: बंगरुळूमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला, म्हणून अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या साहाय्याने वडिलांचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.बंगरूळूमध्ये एका व्यावसायिकाची मुलगी दहावीत शिकत होती. तिचे बी कॉमच्या पहिल्या वर्षाला शिकणार्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तसेच ही मुलगी फोन आणि सोशल मीडियावर सक्रिय होती. ही बाब तिच्या वडिलांना पटत नव्हती. म्हणून ते तिला सारखे ओरडायचे आणि तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधालाही त्यांचा विरोध होता. या गोष्टीला मुलगी कंटाळली होती.शेवटी आपल्या प्रियकरासोबत तिने आपल्याच वडिलांना मारण्याचा कट आखला. शनिवारी मुलीचा भाऊ आणि आई पुद्दुचेरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा मुलीने डाव साधला. वडिलांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय होती. तेव्हा मुलीने दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. वडिलांना झोप लागल्यानंतर मुलीने आपल्या प्रियकराला बोलावले. दोघांनी चाकूने वडिलांना भोसकले. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाथरूममध्ये दोघांनी मृतदेहावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. या घटनेत तरुणाने स्वतःलाही इजा करून घेतली. जेणेकरून पुढे त्यांना वाचवताना या जखमा झाल्या असे भासवता येईल. मृतदेह जाळल्यानंतर मुलीने गच्चीवर जाऊन आरडा ओरड केला आणि तेव्हा प्रियकराने पळ काढला होता.नंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. मुलीची आणि प्रियकराची चौकशी करताना त्यांनी आपणच त्यांचा खून केल्याचे कबूल केले.

Leave a Comment