July 11, 2020
Ajab Samachar

दिव्यांगांना मतदार विशेष नोंदणी करणेबाबत जाहीर आवाहन

कोल्हापूर(प्रतिनिधी) : निवडणूक आयुक्त,निवडणूक आयोग व भारत सरकार यांचेमार्फत सन २०१९ ची लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मतदार पात्र भारतीय नागरीकांनी मतदान करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.  सर्व सामान्य मतदारांबरोबरच दिव्यांगांनीही मतदानात भाग घेणेचा आहे.  त्यांना मतदानास सुलभता व्हावी. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत यापुर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार मतदान पात्र मतदारांचा सर्व्हे झालेला असून कोल्हापूर महानगरपलिका कार्यक्षेत्रातील जे कोणी दिव्यांग बांधव ज्यांची वयाची १८ वर्षे पुर्ण असून ज्यांची मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही अशा सर्वांनी दि. २५ मार्च २०१९ पर्यंत दिव्यांग सहाय्यता कक्ष, मुख्य इमारत, कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडे उचित फॉर्म ( रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा पुरावा व २ रंगीत फोटोसह) भरुन आपली मतदार म्हणून नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment