Ajab Samachar

राज्यात 10 टक्के आरक्षण लागू

मुंबई(प्रतिनिधी) :-  केंद्र सरकारने सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे आरक्षण मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. . त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटनेही खुल्या प्रवर्गातील गरिबांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यामुळे हे आरक्षण लागू करणारे उत्तर प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले. तर आता महाराष्ट्र राज्यातही फडणवीस सरकारनं या आरक्षणाला मंजुरी दिली आहे. 

Leave a Comment